अं.क्र. | योजना | कालावधी | माहिती |
1
| विंधन विहीरीवर/ कुपनलिकावर विद्युत पंप बसवणे/ हात पंपाचे विद्युत रूपांतर करणे | - | निरंक |
2
| नलिकाविहिरीद्वारे पाणी पुरवठा व जलभंजन स्त्रोत बळकटीकरण | - | निरंक |
3
| रोजगार हमी योजना | - | निरंक |
4
| स्थानिक विकास आमदार | - | निरंक |
5
| स्थानिक विकास खासदार | - | निरंक |
6
| डोंगरी विकास कार्यक्रम | - | निरंक |
7
| टँकरने पाणीपुरवठा | - | निरंक |
8
| क वर्ग पर्यटन स्थळांचा विकास | - | निरंक |
9
| कोयना भूकंप | - | निरंक |
10
| राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना (केंद्र हिस्सा) | - | निरंक |
11
| राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना (राज्य हिस्सा) | - | निरंक |
12
| नळपाणी पुरवठा (विशेष घटक योजना) | - | निरंक |
13
| विहीर बांधणे | - | निरंक |
14
| महाराष्ट्र सुवर्णमहोत्सवी ग्रामीण दलित वस्ती पाणी पुरवठा | - | निरंक |
15
| जि.पं. सेस लहान पायबंधारे दुरुस्ती व देखभाल | - | निरंक |
16
| आपत्कालिन परिस्थितीत जि.पं. मार्फत ग्रापापु योजना व जलसंधारण योजना घेणे | - | निरंक |
17
| जलयुक्त शिवार अभियान योजना | - | निरंक |
18
| लघुपाठबंधारे अंतर्गत (० ते १०० हेक्टर) | - | निरंक |
19
| वैधानिक विकास मंडळाचे क्षेत्राअंतर्गत विकास कार्यक्रम | - | निरंक |
20
| नाविन्यपूर्ण योजनेंतर्गत हायड्रम योजना | - | निरंक |
21
| जलजीवन मिशन कार्यक्रम | | जलजीवन कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला घरगुती नळ जोडणीद्वारे 55 लि. प्रती माणशी दराने शुध्द,शाश्वत, पुरेसे ,नियमित व परवडेल अशा पध्दतीने पाणी उपलब्ध करणे हे मुख्य ध्येय आहे. या योजनेमध्ये प्रामुख्याने पाणी गुणवत्ता ,बाधीत क्षेत्र, अवर्षण प्रवण क्षेत्र, संसद आदर्श ग्राम योजनांतील गांवे यांचा प्राधान्य देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक शाळा, अंगणवाडी, संस्था ,ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, व्यायामशाळा, वाचनालये,यासाठी कार्यान्वित नळाद्वारे पाणी पुरवठा करणेचे नियोजन आहे. त्याचबरोबर शाश्वत पाणी मिळण्यासाठी पाणी स्त्रोत, नवीन घेणे व सुधारणा करणे तसेच पाणी पुरवठा सुविधांची निर्मिती करणे व अस्तित्वात योजनांच्या देखभाल दुरुस्तीसाठी प्रोत्साहन करणे हे उदिदष्ट आहे.
तसेच या अंतर्गत लाभार्थी ग्रामस्थांना आपली मालकी व उत्तर दायित्वाची जाणीव करुन देण्यासाठी लोकसहभाग असणे आवश्यक असल्याचे सुचीत केले. या कार्यक्रमांतर्गत सुविधा निर्माण करण्यापेक्षा वितरणावर म्हणजेच प्रत्यक्ष शाश्वत नळ जोडणी करण्यावर भर देण्यात आला आहे.
|
22
| मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम | | राज्यातील ग्रामीण भागातील दीर्घकालीन गरजांचा व आरोग्याचा विचार करुन ग्रामीण जनतेस पुरेसे व शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणेकरीता मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम (MRDWP) या नावाखाली एक सर्व समावेशक कार्यक्रम राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राज्यभरात सन 2016-17 ते 2019-20 या चार वर्षासाठी राबविण्यात येणार असून या कार्यक्रमाचे तीन प्रकारात वर्गीकरण करण्यात येत आहे.
१) मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत हाती घ्यावयाच्या नविन योजना
२) राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत बंद असलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन
३) प्रादेशिक ग्रामीण पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती.
|
23
| 5 लघुपाटबंधारे | | या योजनांतर्गत 0 ते 100 हेक्टरसिंचनक्षमतेपर्यंतच्यायोजना राबविण्यात येतात.
1.ग्रा.प.मागणी.
2.ग्रा.प.ठराव.
3.ग्रा.पं.नेपाणीवापरसंस्थास्थापनकेल्याचाठराव.
4.पाणीवापरसमिती (कमीतकमी 7 लाभार्थीशेतकरी)नोंदणीकृत असणे आवश्यक.
5.संबधितलाभधारकशेतक-यांचे 7/12 उतारे.
6.सिंचनाखालीयेणारेएकूणक्षेत्र.
7.तसेच योजनेमध्ये होणारा पाणीसाठा स.घ.मी. मध्ये आवश्यक आहे.
8.आवश्यकअसल्यासजागेचेबक्षिसपत्र / संम्मतीपत्र.
9.कामताब्यातघेवूनदेखभालवदुरूस्तीकरण्यासतयारअसल्याबाबतग्रा.प.ठराव.
10.तसेच सदर योजना देखभाल व दुरुस्तीसाठी पाणी वापर सहकारी समिती हस्तांतरीत करुन घेणार असलेचे पत्र.
|
24
| नाविन्यपूर्ण विहिरी बांधणे | | जिल्हा नियोजन समितीकडून लोकप्रतिनिधी व समिती सदस्यांच्या शिफारशीनुसार सन 2017-18 पासून जिल्हयातील ज्या गांवे वाडयांमध्ये पाणी पुरवठयाची सोय नाही किंवा अस्तित्वातील सोय पुरेशी नाही, अशा ठिकाणी नाविन्यपूर्ण योजनेतून विहिर घेणे अशा कामाची तरतूद करण्यात आली आहे.
नाविन्यपूर्ण विहिरी योजनेच्या अंतर्गत सूचविलेल्या विहिरींचा परिपूर्ण मागणी प्रस्ताव व बक्षीसपत्र किंवा जमिन शासनाचे नांवे असल्याबाबतचा पुरावा सादर केल्यावरच सदर काम हाती घेणेत येते.
|
25
| खनिकर्म विकास योजना | | ज्या गावामधून गौण खनिज उत्पादन केले जाते, त्या गावांतील विकास कामांकरीता सदरचा निधी हा जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत खनिकर्म विकास योजनांतर्गत देण्यात येतो.
वरील योजनेसाठी ग्रामपंचायतीचा परिपूर्ण मागणी प्रस्ताव आवश्यक आहे.
|
26
| १.खासदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2.आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 3.डोंगरी विकास कार्यक्रम | | ज्या कामांना जिल्हा नियोजन समितीत प्राधान्य व महत्व मिळत नाही किंवा जी कामे जिल्हा योजनेत घेण्यात येत नाहीत, अशी लोकोपयोगी कामे या योजनेतून घेतली जातात.
जिल्हा वार्षिक योजना राबवितांना निधी अभावी किंवा योजनेतील प्राधान्यक्रमाअभावी जी लहान लहान लोकोपयोगी कामे मागे राहतांत अशी कामे स्थानिक लोकप्रतिनिधींना सुचवितात येतात. या कार्यक्रमांतर्गत घ्यावयाची कामे शासकीय किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जागेवरच घेता येतात. या कार्यक्रमांतर्गत निर्माण होणारी मालमत्ता ही शासनाच्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मालकीची राहील. कामे मंजूर करण्यापूर्वी या कामांचा देखभाल व दुरुस्तीची हमी संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने घेणे बंधनकारक आहे.
या विभागांतर्गत वरील योजनेखाली घ्यावयाची अनुज्ञेय कामे खालीलप्रमाणे.
1.पाणी पुरवठा योजना - 1. ज्या गावांत नळपाणी पुरवठा योजना नसतील अशा गावामध्ये नळपाणी पुरवठा योजना घेणेत याव्यात.
2. ज्या गावांसाठी नळपाणी पुरवठा योजना अगोदरच झाल्या असतील अशा गावांतील वाडयांसाठी जादा पाईपलाईन टाकून वाडयांना पाणी पुरवठा करणेसाठी पाण्याची टाकी बांधणे.
2.विंधण विहिर - विंधण विहिरींची कामे पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या प्रमाणकानुसार करणे
3.सामुहिक विहिर - विहिरी खोदण्याची कामे ग्राम विकास विभाग व पाणी पुरवठा व स्वच्छता
विभागाच्या प्रमाणाकानुसार करणे. आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे.
1कामाला जिल्हा नियोजन समितीकडून मंजूरी मिळणे आवश्यक राहील.2.ग्रा.प.मागणी.3.ग्रा.प.ठराव.4.जागेचे जि.प.च्या नांवे 7/12 उतारा व बक्षिसपत्र.
5.भूजल सर्व्हेक्षण व विकास यंत्रणेचा उद्भव दाखला आवश्यक
|
27
| टंचाई परिस्थिती निवारणार्थ घ्यावयाच्या उपाय योजनां | | राज्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्याच्या कामास गती देण्याच्या दृष्टीने "पाणी पुरवठा व स्वच्छता " या स्वतंत्र विभागाची स्थापना करण्यात आली. दरवर्षी अपु-या पर्जन्यामुळे किंवा अन्य कारणामुळे राज्यांत ग्रामीण क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास त्याबाबत करावयाच्या उपाय योजनांवर ग्राम विकास व जलसंधारण विभागाच्या शासन निर्णयानुसार पिण्याच्या पाण्याच्या टंचाई निवारणार्थ विविध उपाय योजना धेण्यात येतात. याबाबत शासन निर्णय क्र.टंचाई/1099/प्रक्र/12/ पापु14/ दिनांक 03.2.1999 अन्वये आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
टंचाई निवारणार्थ अनुज्ञेय उपाय योजना खालीलप्रमाणे.
1.बुडक्या घेणे.
2.विहिरी खोल करणे/गाळ काढणे
3.खाजगी विहिरींचे अधिग्रहण करणे.
4.टॅन्कर/बैलगाडींद्वारे पाणी पुरवठा करणे.
5.प्रगतीपथावरील पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करणे.
6.नळ योजनांची विशेष दुरुस्ती करणे.
7.विंधण विहिरींची विशेष दुरुस्ती करणे.
8.विंधण विहिरी घेणे.
9.तात्पूरत्या पूरक नपापुयो घेणे.
तालुकास्तरावरुन प्राप्त झालेल्या व टंचाई आराखडयात समाविष्ट असलेल्या गांवे वाडयांतील अस्तित्वातील पाणी पुरवठा सुविधांची माहिती व आवश्यक असलेली उपाय योजनांची माहिती टंचाईचे प्रपत्र “अ” व “ब” मध्ये आवश्यक.
सदर प्रपत्रावर गट विकास अधिकारी, उप अभियंता व भुजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे अधिकारी यांनी सदर उपाय योजना आराखडयात घेतल्यास तेथील पाणी टंचाई दूर होऊ शकेल अशी शिफारस करणे आवश्यक.
|
28
| कोयना भुकंप | | कोयना भुकंप प्रवण क्षेत्रातील गांवे वाडयांमधून ग्रामस्थांना पाणी पुरवठयाच्या सोई सुविधा मिळणेसाठी सदर निधीमधून तरतूद करण्यात येते. यामध्ये रत्नागिरी जिल्हयातील चिपळूण व संगमेश्वर तालुक्यातील काही गावांचा समोवश असून शासनस्तरावर कोयना भुकंप पुनर्वसन समिती गठित केलेली आहे. त्या समितीकडे संबंधीत तालुक्यातील आमदारांकडून सुचविलेल्या कामांना त्या समितीमध्ये मान्यता दिलेल्या कामांचे प्रस्ताव देण्याबाबत कोयना भुकंप पुनर्वसन समितीकडून पत्रव्यवहार होतो. त्यानुसार कामांचे प्रस्ताव मागविले जातात. |
29
| नैसर्गिक आपत्ती (अतिवृष्टी) | | जिल्हयांत पावसाळयामध्ये ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडील नळपाणी पुरवठा योजना, विहिरी, तळी, बंधारे, विंधण विहिरी अशा प्रकारच्या योजना अतिवृष्टीमुळे बाधीत होतात. त्यांच्या दुरुस्तीसाठी शासन स्तरावरुन अतिवृष्टी अनुदान दिले जाते. त्यामधून अशा बाधीत योजनांची दुरुस्तीची कामे करण्यात येतात.तसेच जिल्हा नियोजन समितीकडून जिल्हा वार्षिेक योजनांतर्गत अतिवृष्टी बाधीत कामांना दुरुस्तीसाठी अनुदान प्राप्त होते. |
30
| जिल्हा परिषद देखभाल व दुरुस्ती | | ग्रामीण पाणी पुरवठा योजना पुर्ण झाल्यानंतर एक वर्ष योजना चालविणे कंत्राटदारावर बंधनकारक आहे.योजना पुर्ण झाल्यानंतर व यशस्वी चाचणी दिल्यानंतर योजना ग्रामपाणी पुरवठा व स्वच्छता समितीकडे देखभाल-दुरुस्ती व व्यवस्थापनासाठी
सोपविली जाते.तथापि अनेक स्थानिक स्वराज्य संस्था या योजनांची देखभाल दुरुस्ती व व्यवस्थापन योग्य प्रकारे करीत नाहीत.या बाबी लक्षात घेऊन ग्राम पाणी पुरवठा योजनांची देखभाल दुरुस्ती जलव्यवस्थापन समितीच्या मान्यतेने खाजगी यंत्रणा / कंत्राट दाराकडुन करुन घेण्यासाठी मुभा देण्यात आलेली आहे.त्यासाठी ग्रामपंचायतीने आवश्यक करारपत्र खाजगी यंत्रणा / कंत्राटदारासोबत करणे आवश्यक आहे.
देखभाल दुरुस्तीकरिता शासनामार्फत कोणताही स्वरुपाचा अतिरिक्त निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. उपलब्धे बजेट नुसार देखभाल दुरुस्तीचा आराखडा करणेत येत असतो.या करिता कार्यकारी अभियंता ,ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ,जिल्हा परिषद यांनी स्वत: पाहणी करुन पाणी पुरवठा योजनेची दुरुस्ती कोणत्या परिस्थितीमुळे
उद्भवली याची कारणमिमांसा देऊन स्थळ निरीक्षण अहवाल देणे अवश्यक असते.व उपलब्ध निधीच्या मर्यादेतच नपापु योजना दुरुस्तीस निधी उपलब्ध करुन देण्यात येत असतो.जर देखभाल दुरुस्ती जिल्हा परिषद मार्फत करुन देण्यात येणार असेल तर पाणी पट्टीची संपुर्ण रक्कम जिल्हा देखभाल निधीमध्ये जमा करणे आवश्यक आहे.
|
31
| अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर विजपंप उभारणी करुन दुहेरी पंप योजना | | अस्तीत्वात असलेल्या हातपंपावर विजपंप उभारणी करुन दुहेरी पंप योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
1. ग्रामपंचायतीचे योजना मागणी पत्र
2. ग्रामसभेचा आदर्श नमुन्यामध्ये ठराव. दुहेरी पंप आवश्यक असलेबाबत.
3. विंधण विहीरीच्या पाणी क्षमता चाचणी ग्रामपंचायतीने माहे एप्रिल व मे महिन्यात या कार्यालयातील संबंधीत अभियंता यांचे समक्ष घेणे आवश्यक आहे.
4. विंधण विहीरीचे पाणी गुणवत्ता चाचणी अहवाल आरोग्य खात्याचा सोबत जोडावा.
5. मासिक सभा ठराव योजना ताब्यात घेऊन देखभाल दुरूस्ती करण्यास ग्रामपंचायत तयार असले बाबत. तसेच योजनेतून पाणी पुरवठा चालू झाल्यानंतर मालमत्ता नोंदवहीत नोंद घेऊन पाणी पट्टी त्वरीत वसूलीची कार्यवाही ग्रामपंचायत करण्यास तयार असल्याचा ठराव.
10. विंधण विहिरीच्या जागेचे बक्षिस पत्र (1ú गुंठा जागेचे बक्षीसपत्र)
11. विंधण विहिरीच्या जागेचा बक्षिस पत्राप्रमाणे नोंद झालेला 7/12 उतारा.
12. टाकीच्या जागेचे संमत्तीपत्र (विं.वि. व टाकीची जागा वेगवेगळी असल्यास)
13. टाकीच्या जागेचा 7/12 (तिन) महिन्याच्या आतील.
14. प्रशासकीय मान्यता आदेश (अंदाजपत्रकास तांत्रिक मंजूरी मिळाले नंतर)
15. वीज वितरण कंपनीचा नाहरकत दाखला. (सिंगल फेज विज जोडणी देणे बाबत)
|
32
| पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिर खोदणे | | पिण्याच्या पाण्यासाठी विंधण विहिर खोदणे या योजनेसाठी खालीलप्रमाणे कागदपत्रांची आवश्यकता आहे.
1.ग्रामपंचायतीचे मागणीपत्र - सरपंच व ग्रामसेवक यांचे संयुक्त सहीने
2.ग्रामसभेचा ठराव - विंधण विहीर आवश्यक असलेबाबत.
3.ग्रामपंचायत मासिक सभा ठराव - विंधण विहीर ताब्यात घेऊन देखभाल दुरुस्ती करणेस तयार असलेबाबत,विंधण विहीर पुर्ण झाल्यानंतर मालमत्ता नोंदवहीत नोंद घेऊन पाणीपटटी आकारणी त्वरीत सुरु करून हातपंप दुरूस्ती व देखभालासाठी करारपत्र करून दरवर्षी रु.1000/- वर्गणी
जिल्हा परिषदेकडे जमा न केल्यास ती ग्राम पंचायतीस देय अनुदानातून वसूल करण्यास हरकत नसलेचे पत्र.
4) लाभार्थ्यांची विंधण विहीरीची मागणीबाबत यादी नांव व स्वाक्षरीसह. (यादी खाली सरपंच व ग्रामसेवक.यांचे संयुक्त सहिने)
5) वाडीचा व प्रत्यक्ष लाभार्थ्यांचा लोकसंख्येचा ग्रामपंचायत दाखला.
6 विंधण विहीरींसाठी निश्चित केलेल्या जागेच्या 7/12 वर नोंद असलेल्या हिस्सेदारांच्या स्वाक्षरीने रु.200/-च्या स्टॅम्पपेपरवर तहसिलदार कार्यालयात नोंदणीसह करणे आवश्यक आहे.
त्या मध्ये विंधण विहीरीसाठी 1.0 गुंठा जागा विनामोबदला बक्षिसपत्र करून देण्यास तयार असल्याचे स्पष्ट नमूद करण्यात यावे. विंधण विहीर खोदल्यानंतर स्वखर्चाने बक्षिसपत्र करून देत असल्याचे सम्मती पत्रात नमुद असणे आवश्यक आहे. सम्मतीपत्र व 7/12 मुळ प्रतीत प्रस्तावासोबत तीन महिन्याच्या आतील जोडणे आवश्यक आहे.
7) विंधण विहीर खोदाईनंतर ग्रामपंचायत जमिन मालकाकडून बक्षिस पत्र करून घेण्याची कार्यवाही करून घेइल असा सरपंच व ग्रामसेवकांच्या सहिचा दाखला जोडावा.
8) यापुर्वी या वाडीमध्ये विंधण विहीर घेतली असल्यास त्यासंबंधी माहिती.
9) सद्या वाडीत कोणत्या सुविधा आहेत.शासकीय /खाजगी .त्याव्दारे पाणी कमी पडत असल्यास किती व केंव्हापासून याबाबतचा उप अभियंता ग्रापापु जि.प.उपविभाग यांचा शिफारशीसह
दाखला.तसेच सदर वाडीसाठी अन्य कोणतीही पिण्याच्या पाण्याची योजना राष्ट्रीय पेयजल अथवा अन्य योजनेतून प्रस्तावित अथवा मंजूर नाही याबाबतचा दाखला.
10) काम करण्यापूर्वी निश्चित केलेल्या विंधण विहीर जाग़ेचा फोटो आवश्यक आहे. (एकावर फोटो चिकटवून त्या कागदावर गाव, वाडी लिहून खाली सरपंच व ग्रामसेवक यांची
स्वाक्षरी सह)
11) निश्चित केलेल्या विंधण विहीर जाग़ेवर विंधण विहीर खोदाई झाल्या नंतरचा फोटो देणे बंधनकारक राहिल.
वरीलप्रमाणे सर्व कागदपत्र .प्रस्तावासोबत जोडले असल्याची खात्री करण्यात यावी. प्रस्तावातील प्रत्येक कागदपत्रावर सरपंच व ग्रामसेवक यांची स्वाक्षरी आवश्यक आहे. तसेच सर्व कागदपत्रांची झेरॉक्स प्रत ग्रामपंचायत दप्तरी जतन करुन ठेवणेची आहे. कृपया अर्धवट प्रस्ताव पाठवू नयेत तसेच जड वाहन जाणेसाठी रस्ता नसेल अश्या वाड्यांचे प्रस्तावही विंधण विहीरी साठी पाठवू नयेत
|
33
| वसंतराव नाईक तांडा/वस्ती सुधार योजना | | या योजनेखाली गावातील जोडरस्ते/संरक्षण भिंत/पाखाडी/शौचालय /पाणी पुरवठा इत्यादी कामे घेतली जातात.
योजनेसाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
सरपंचांचे सहीचे काम मागणीपत्र
2.कामाचे तांत्रिक मान्यतेसह अंदाजपत्रक (बांधकाम विभाग )
3.कामाच्या जागेबाबत नमुना क्र.23/ संमत्तीपत्रची सत्यप्रत
4.मागणी केलेल्या वस्तीतील तांडा वस्तीची लोकसंख्या दाखला
5.ग्रामपंचायतीचे ठराव
अ) मंजूर अनुदानापेक्षा जादा रक्कम खर्च करणेस तयार असलेबाबत
ब) सहा महिन्यांत काम पूर्ण करण्यास तयार असलेबाबत.
6.सदर काम अन्य योजनेतून प्रस्तावित केलेले नाही/ मंजूर नाही या बाबत गट विकास अधिकारी यांचा दाखला
7.सदर कामाचा लाभ तांडा/वस्तीला होणार असलेबाबत सरपंच ग्रामसेवक यांचा दाखला
8.तांडावस्तीमध्ये पाणी पुरवठयाची कायमस्वरुपी सोय असलेबाबत ग्रा.पं.चा दाखला
9.जागेचा मुळ फोटो (ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीसह )
10.मंजूर कामाची देखभाल दुरुस्ती ग्रामपंचायत करण्यास तयार असलेबाबत दाखला.
11.सर्व प्रतींवर सरपंच ग्रामसेवक यांची स्वाक्षरी आवश्यक
|