अं.क्र.योजनाकालावधीमाहिती
1 राज्य पुरस्कृत पिक संरक्षण योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सर्व फळपिके,फुलपिके,भाजीपाला,मसाला पिके,औषधी/सुगंधी वनस्पती या पिकावरील किड व रोग नियंत्रणासाठी 50 टक्के अनुदानावर किटकनाशके/बुरशीनाशके यांचा पुरवठा केला जातो.
2 राष्ट्रीय बायोगॅस विकास योजना उर्जा शक्तीची काटकसर करणे व इंधनाचे पर्यायी साधन उपलब्ध करुन देणे तसेच प्रदुषण टाळण्यासाठी बायोगॅस हा एक चांगला पर्याय आहे. बायोगॅस मधून स्वयंपाकासाठी गॅस मिळतो तसेच प्लांटमधुन बाहेर पडणारे खत शेतीसाठी उपयुक्त आहे. बायोगॅस उभारणीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र शासनामार्फत बायोगॅस उभारणीसाठी 2ते4 घ.मी.साठी रु.8,000/- इतके अनुदान देण्यात येते. तसेच बायोगॅसला शौचालय जोडावयास अतिरीक्त रक्कम रु.1,000/- इतके अनुदान दिले जाते.
3 विशेष घटक योजना या योजनेअंतर्गत अनुजाती/नवबौध्द शेतकऱ्यांना जमिन सुधारणा,निविष्ठा पुरवठा,पिकसंरक्षण औजारे ,सुधारीत औजारे,बैलजोडी,बैलगाडी,इनवेल बोअरींग, जुनी विहीर दुरुस्ती,पाईपलाईन,पंपसेट,नविन विहीर,शेततळे परसबाग,तृषार/ठिबक सिंचन संच या बाबीकरीता 100 टक्के अनुदान वितरीत केली जाते त्यासाठी अ) यासाठी लाभार्थीच्या नावे 6 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमिन असणे आवश्यक आहे. ब) लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 50,000/- पेक्षा कमी असणे आवश्यक आहे. क) निवड करण्यात आलेल्या लाभार्थींना दोन वर्षाचे कालावधीत कमाल अनुदान वस्तुरुपात देय आहे. ड) शेतकऱ्यासाठी रक्कम रु.50,000/- ची अनुदान असली तरी मागासवर्गीय लाभार्थी विहीर या घटकाचा लाभ घेईल त्यास अनुदानाची मर्यादा ही रक्कम रु.1,00,000/- एवढी आहे.
4 शेतकरी मासिक योजना कृषि व संलग्न विषयाशी निगडीत माहिती आधुनिक कृषि तंत्रज्ञान,कृषि संशोधन इत्यादी बाबतची उपयुक्त माहिती असलेले शेतकरी मासिक पुस्तीका कृषि विभागामार्फत प्रकाशीत करण्यात येते. सदर मासिकाची वार्षिक वर्गणी रु.150/-इतकी आहे. वर्गणी पाठविण्याचा पत्ता संपादक,शेतकरी मासिक,कृषि आयुक्तालय,कृषि भवन,शिवाजीनगर पुणे-5 असा आहे
5 सौर ऊर्जा विकास योजना या योजनेअंतर्गत महाराष्ट उर्जा विकास अभिकरण ,पुणे यांचे मार्फत सौर उर्जाविषयक उपकरणे उदा. पथदिप,उर्जा कार्यक्षम पथदिप,घरगुती दिवे,सौर अभ्यासिका इ. साठी अनुदान दिले जाते.
6 डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2021 -220डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना सन 2021 -22
अं.क्र.विभागप्रश्नउत्तर
1 कृषी विभाग योजनाविघयो योजनेचा लाभ घेणारे लाभार्थी मयत झाल्यास सदर लाभार्थ्याचा उर्वरित लाभ कोणास देता येतोमयत लाभार्थ्याच्या वारसाला
2 कृषी विभाग योजनाविघयो योजनेचा लाभ लाभार्थ्यासं किती वेळा घेता येतोफक्त एक वेळा
3 कृषी विभाग योजनाबायोगॅस सयंत्र हे किती घन मिटर पर्यंत लाभ देता येतो .शासनस्तरावरून उपलब्ध होणाऱ्या अनुदान नुसार १ ते ६ घन मिटर मर्यादेपर्यंत लाभार्थीना लाभ देता येतो .
4 कृषी विभाग योजनापीक संरक्षण औषधे पुरवणे योजनेचा मुख्य उदेश काय ?५० टकके अनुदानावर सर्व शेतकऱ्यांना औषध पुरवठा करणेसाठी अनुदान दिला जातो.
5 कृषी विभाग योजनापीक संरक्षण औषधे पुरवणे योजनेचे आवश्यक कागदपत्र कोणते ?मागणी अर्ज,शेतकऱ्यांचा ७/१२ ओळखपत्र असणे आवश्यक.
6 कृषी विभाग योजनासुधारित कृषि औजारे पुरवणे योजनेचे औजारे पुरवठा करणेसाठी कोणते कागदपत्राची आवश्यकता लागते?मागणी अर्ज,शेतकऱ्यांचा ७/१२ ओळखपत्र असणे आवश्यक.
7 कृषी विभाग योजनासुधारित कृषि औजारे पुरवणे योजनेचे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी सदर योजने अंतर्गत मदत केली जाते काय?होय
8 कृषी विभाग योजनाराष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यकार्मांतर्गत लाभार्थ्यास सयंत्र उभारणीसाठी अनूदान किती मिळते ?२ ते ६ घन मिटर सयंत्रासाठी अनुदान सर्वसाधारण लाभार्थी रक्कम रुपये ९०००/- मागासवर्गीय लाभार्थी रक्कम रुपये ११,०००/- शौचालयं सयंत्रास जोडल्यास प्रति सयंत्र रक्कम रुपये १२००/- अतिरिक्त अनुदान मिळते
9 कृषी विभाग योजनाखत परवान्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्यकता लागते .१] खत नियंत्रण आदेश १९८५ कलम ८ (२) नुसार विहित फार्म AI मध्ये अर्ज (दोन प्रतीत) २] उत्पादक कंपनीचे उगमप्रमानपत्र form o (दोन प्रतीत). ३]ऑन लाईन पेमेंट फी किरकोळ रु.४५०/- घाऊक रु.२२५०/-
10 कृषी विभाग योजनाकीटकनाशक परवान्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्कता लागते?कीटकनाशक आदेश कलम १०(१) नुसार विहित फार्म क्र VI मध्ये अर्ज (दोन प्रतीत) २] उत्पादक कंपनीचे उगमप्रमानपत्र form VI-D व सोबत उगमप्रमानपात्रातील औषधापैकी विक्री करावयाच्या कीटकनाश्कांची यादी (दोन प्रतीत) ३]ऑन लाईन पेमेंट फी रु.३००/- नुतनीकरण र.रू .३००/-
11 कृषी विभाग योजनाबियाणे परवान्यासाठी कोणत्या कागदपत्राची आवश्कता लागते?बियाणे नियंत्रण आदेश १९८३ कलम ४ नुसार विहित फार्म A मध्ये अर्ज (दोन प्रतीत) २]उत्पादक कंपनीचे उगमप्रमानपत्र व त्यासोबत उगम प्रमानपात्रातील बियाण्यापैकी विक्री करावयाच्या बियाण्याची यादी (दोन प्रतीत). ३]ऑन लाईन पेमेंट फी रू.१०००/- नुतनीकरण र.रू.५००/-
12 कृषी विभाग योजनाविघयो अंतर्गत लाभार्थी निवड करताना जमीन धारणेची अट काय आहेलाभार्थीचे नावे जास्तीत जास्त ६ हेक्टर क्षेत्र असावे कमीत कमी क्षेत्राची अट नाही
13 कृषी विभाग योजनाविघयो अंतर्गत लाभार्थीसं किती अनुदान दिले जातेविघयो अंतर्गत र.रू.५०,०००/- च्या मर्यादेत वस्तूरुपात दोन आर्थिक वर्षात लाभ दिला जातो
14 कृषी विभाग योजनाविघयो अंतर्गत नवीन विहिरीचा लाभ घेणाऱ्यास किती अनुदान दिले जाते र.रू.७०,००० ते र.रू.१,००,०००/-
15 कृषी विभाग योजनाविघयो अंतर्गत नवीन विहिरीचा लाभ घेणाऱ्यास योजनेअंतर्गत इतर साहित्याचा लाभ दिला जातो कानाही
16 कृषी विभाग योजनासुधारित कृषि औजारे पुरवणे योजने अंतर्गत कृषि विभागामार्फत कोणकोणते औजारे पुरवठा केली जातात?प्लॅस्टीक क्रेट्सं .पॉवर स्प्रेअर,डीझेल पंप,इलेक्ट्रिक पंप ,एचडीपीई पाईप, भात मळणी यंत्र ,विळे,रोटरी टिलर,सौर कंदील ईत्यादी .
17 कृषी विभाग योजनाविघयो अंतर्गत लाभधारक निवडण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहेविहित नमुन्यातील अर्ज शेतकऱ्याच्या स्वाक्षरीसह २]७/१२ उतारा (३ महिन्याच्या आतील )मूळ प्रत ३]८ अ चा उतारा मूळपत्र (३ महिन्याच्या आतील ) ४]दारिद्र् रेषेखालील दाखला/उत्पनाचा दाखला मा.तहसीलदार यांचा (५०,००० /- पर्यंत) ५]जातीचा दाखला (अ.जा./नवबौद्ध असलेबाबत मा.तहसीलदार यांचा ) ६]शेतकऱ्यांचे कुटुंब मर्यादित असलेबा बतचा ग्रामसेवक यांचा दाखला ७]ग्रामसभेचा लाभार्थ्री निवड ठरावाची सत्यप्रत (सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त स्वाक्षरीचे) ८]शेतकऱ्याचे रेशन कार्डची साक्षाकीत प्रत ९] ]शेतकऱ्याचे फोटो ओळखपत्र (इलेक्शन कार्ड/बँक पासबुक/आधार कार्ड/फोटोचे रेशनकार्ड ) १०]कृषि अधिकारी व गट विकास अधिकारी यांचे स्वाक्षरी प्रमाणपत्र
18 कृषी विभाग योजनाविघयो अंतर्गत कोणत्या बाबीचा लाभ दिला जातोजमीन सुधारणा,निविष्ठा,सुधारित कृषि औजारे,बैलजोडी,बैलगाडी,जुनी विहीर दुरुस्ती,ईनवेल विहीर,शेततळे ,परसबाग ,नवीन विहीर,शेततळे ,परसबाग ,तुषार /ठिबक सिंचन संच ,ताडपत्री
19 कृषी विभाग योजनाअज्ञान वारसदारचे बाबतीत अज्ञान व्यक्तीने १८ वर्षे पूर्ण (सज्ञान)झालेवर एक वर्षाचे आत अर्ज करणे आवशयक आहे. (अर्जदाराचा जन्म दिनाक पडताळणी साठी शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक ) सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र.अकंपा-१०९५/प्र.क्र.३४-अ/आठ ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाक ११ सप्टेंबर ११९६ नुसार अज्ञान वारसदाराचे बाबतीत अज्ञान व्यक्तीने १८ वर्षे पूर्ण (संज्ञान)झालेवर एक वर्षाचे आत अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे.सदर तरतुदीनुसार कुटुंबातील अज्ञान वारसदारापैकी कोणीही एकाने संज्ञान झाल्यावर एका वर्षाच्या आत अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज करणे आवश्यक आहे .त्यामुळे प्रथम संज्ञान होणार्याने किवा कनिष्ठ संज्ञान होणार्याने अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला तरी तो अर्ज अनुकंपा नियुक्तीसाठी ग्राह्य धरता येईल .
20 कृषी विभाग योजनादिवंगत राज्य शासकीय कार्मचा-याच्या कुटुंबामध्ये फक्त विवाहित मुलगी हे एकमेव आपत्य असल्यास किवा त्याचे कुटुंब फक्त विवाहित मुलीवर अवलंबून असेल अशा प्रकरणी शासकीय कार्मचा-याची विवाहित मुलगी ही अनुकंपा नियुक्तीसाठी पात्र राहील.सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्र. अकंपा -१०१३/प्र.कं.८/आठ,मंत्रालय,मुंबई-३२,दिनाक २६ फेब्रुवारी २०१३
21 कृषी विभाग योजनाया कायद्यानुसार रोजगारासाठी कोण अर्ज करू शकते?कोणत्याही गावातील प्रत्येक घरातील प्रौढ व्यक्ती त्या परिसरात होणारे अकुशल काम करण्यासाठी अर्ज करू शकतात. एखादी व्यक्ती आधीपासून रोजगार करत असेल तर तो देखील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायद्याच्या आधारे रोजगारासाठी अर्ज करू शकते. महिलांना प्राधान्य दिले जाते. या योजनेच्या अंतर्गत किमान १/३ महिलांची नोंदणी करून त्यांना काम दिले जाते.
अं.क्र.पदांचे नावमंजुर पदेभरलेली पदेरिक्त पदे
1 कृषि विकास अधिकारी110
2 जिल्हा कृषि अधिकारी (नियमित)101
3 जिल्हा कृषि अधिकारी (वि.घ.यो)101
4 मोहिम अधिकारी101
5 कृषी अधिकारी18144
6 विस्तार अधिकारी (कृषी)261412
अं.क्र.कार्यालयाकडून पुरवली जाणारी सेवाकर्मचारी/अधिकाऱ्याचे नावआवश्यक कागद पूर्तता केल्यानंतर किती कालावधीत सेवा पुरवली जाईलसेवा कालावधीत पुरवली न गेल्यास ज्याच्या कडे तक्रार करता येईल तो अधिकारी
1 डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजनेअंतर्गत अनु.जातीच्या लार्भीर्थ्याना विहीर बांधून देणेकृषि विकास अधिकारी-कृषि विकास अधिकारी1 (आर्थिक वर्ष)मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
2 राष्ट्रीय बायोगॅस योजनाकृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी-कृषि विकास अधिकारी1 (आर्थिक वर्ष)मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
3 जिल्हा परिषद सेस अंतर्गत शेतक-यांना 75% अनुदानावर औजारे पुरविणे, उदा. ताडपत्री, एच.डी.पाईप/इलेक्ट्रीकल पंप/डिझेल पंप/आंबा क्रेट / पॉवर स्प्र, ग्रासकटर . कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी-कृषि विकास अधिकारी1 (आर्थिक वर्ष)कृषि विकास अधिकारी, जिल्हा परिषद रत्नागिरी
नाव :
पदनाम :
मोबाईल नंबर :
विषय :
अर्जाचा तपशील :