माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिम -१

दि.03 ऑक्टोबर 2020 रोजी माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत तालुक्यांमध्ये जनजागृतीसाठी चित्ररथाला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करताना मा.श्री.रोहन बने - अध्यक्ष, जि.प. रत्नागिरी, मा.श्री.महेश म्हाप-सभापती बांधकाम व आरोग्य, जि.प.रत्नागिरी, मा.डॉ.श्रीम. इंदुमती जाखड-मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. रत्नागिरी, मा.डॉ.श्रीम.बी. एस. कमलापूरकर -जिल्हा आरोग्य अधिकारी, इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग.

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिम - २

माझ कुटुंब माझी जबाबदारी मोहिम माहे ऑक्टोबर 2020 मध्ये आरोग्य विभागामार्फत तयार करण्यात आलेला चित्ररथ तालुक्यांमध्ये जनजागृती करताना.

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिम - ३

माहे सप्टेंबर 2020 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र अडरे अंतर्गत काळूस्ते गावामध्ये माझ कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी करताना आरोग्य कर्मचारी.

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिम - ४

माहे ऑक्टोबर 2020 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आंजर्ले अंतर्गत सुकोंडी गावामध्ये माझ कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेची अंमलबजावणी करताना आरोग्य कर्मचारी.

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिम - ५

मा.डॉ.श्रीम. इंदुमती जाखड-मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. रत्नागिरी प्राथमिक आरोग्य केंद्र हेदवी अंतर्गत उपकेंद्र उमराट मधील तांबेवाडी येथे दि.28 सप्टेंबर 2020 मध्ये माझ कुटुंब माझी जबाबदारी मोहिम अंतर्गत आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांचा कार्यक्षेत्रामध्ये राबवत असलेल्या मोहिमेचा आढावा घेताना.

माझं कुटुंब माझी जबाबदारी मोहिम

मौजे कारवांचीवाडी येथे माझ कुटुंब माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत माहे ऑक्टोबर 2020 मध्ये शेतकरी महिलांची शेताच्या बांधावर जाऊन आरोग्य तपासणी करताना आशा स्वयंसेविका श्रीम.साक्षी कुळये व स्वयंसेवक श्री.तानाजी कुळये.

सॅनिटरी नॅपकीन वाटप

माहे ऑक्टोबर 2019 मध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद अंतर्गत गाव वाटद येथे शालेय विद्यार्थीनींना सॅनिटरी नॅपकीन वाटप करताना आरोग्य सेविका व आशा स्वयंसेविका.

बालकांना गृह स्तरावर भेट

प्राथमिक आरोग्य केंद्र वाटद अंतर्गत ग्रामपंचायत वाटद येथे एस.एन.सी.यू. मधून डिस्चार्ज दिलेल्या बालकांना गृह स्तरावर भेट देताना आशा स्वयंसेविका व मदतनीस.

सार्वजनिक विहिरीवर जाळी बसविणे.

प्राथमिक आरोग्य केंद्र शिपोशी अंतर्गत ग्रामपंचायत तळवडे मधील आडवली गांव येथे माहे ऑक्टोबर 2019 मध्ये ग्राम आरोग्य, पोषण, पाणी पुरवठा स्वच्छता समितीच्या निधी अंतर्गत आशा स्वयंसेविका यांचेमार्फत गावातील सार्वजनिक विहिरीवर जाळी बसविण्यात आली